

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) कासारवाडी येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या पूनम गलांडे. निदेशक यांनी एकात्ममानववाद, भविष्यातील कौशल्य विकासाचे महत्व, विविध कौशल्य विकास योजना, व आयटीआय च्या विविध ट्रेड मधील नोकरीच्या संधी तसेच भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या आयटीआय मुलांसाठी असलेल्या योजने संदर्भात मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य ज्योत सोनवणे, तसेच निदेशक मनसरा कुमावणी, वंदना चिंचवडे, हेमाली कोंडे, बबिता गावंडे,सोनाली निलवर्ण, सिद्धार्थ कांबळे यांची उपस्थिती होती. तसेच विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

यावेळी विद्यार्थ्यांनी कौशल्यबाबत स्वतःची मते देखील मांडली. आणि आयटीआयमध्ये ऍडमिशन घेतल्यामुळे करियरला योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्रीम.मनसरा कुमावणी यांनी केले.

























Join Our Whatsapp Group