
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी प्रभाग क्र.१० अंतर्गत अहिल्याबाई होळकर चौकातील (Finolex चौक) Signal Island च्या सुशोभीकरणचे काम रद्द करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा (विद्यार्थी विभाग) जिल्हा संयोजक अनिकेत ज्ञानेश्वर शेलार यांनी केली आहे.

अनिकेत शेलार यांनी यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी प्रभाग क्र.१० अंतर्गत अहिल्याबाई होळकर चौकातील (Finolex चौक) signal island च्या सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. सदर चौक हा शहरातील मोक्याच्या ठिकाणी असून येथे वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात आहे. शालेय बस, कामगार बस, पिंपरी मार्केटकडे जाणारा ग्राहक व कामगार वर्ग व मेट्रोचे टर्मिनल स्टेशन आहे. त्यामुळे या चौकाला विशेष महत्व आहे.

ह्या चौकात या पूर्वीच ट्रैफिक Island असून त्याचा भौगोलिक व्यास/आकारमान बरोबर असून वाहतूक नियोजन योग्य रित्या होत आहे. परंतु सुशोभीकरणाचे कामामुळे ट्रैफिक आयलंडची बहुतेक आकारमान वाढत असून त्यामुळे वाहनांचा point of collision मध्ये वाढ होऊन ट्रैफिक वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरचे सुशोभीकरणाचे काम तांत्रिक दृष्ट्या योग्य नसून लेन साईज कमी होऊन उपलब्ध सिग्नल वेळ पुरेसा राहणार नाही.

तरी या सुशोभीकरणचे काम रद्द करण्यात यावे अशी आसपासच्या परिसरातील बहुतांश लोकांची देखील मागणी आहे. तरी सदर काम तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी अनिकेत शेलार यांनी केली आहे.



























Join Our Whatsapp Group