
सोलापूर, बीड जिल्ह्यातील पूरग्रस्तांनाही मदतीचा हात
पिंपरी (Pclive7.com):- चिखली, नेवाळे वस्ती, पूर्णानगर प्रभाग क्रमांक ११ मधील भाजपाचे संयमी आणि अभ्यासू नेतृत्व अशी ओळख असलेले निलेश नेवाळे यांचा वाढदिवस रोजगार मेळावा, आरोग्य शिबिर, सोलापूर – बीड जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देत विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

निलेश नेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि.२८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या कालावधीत ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात ३६७ तरूणांनी सहभाग घेतला, त्यापैकी २५६ जणांना तात्काळ जॉइनिंग लेटर देत नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच प्रभाग क्रमांक ११ नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती, कुदळवाडी भाग, कृष्णानगर, शरदनगर, कोयनानगर, महात्मा फुलेनगर, पुर्णानगर, घरकुल प्रकल्प, अजंठानगर, दुर्गानगर परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १ हजार ३४३ नागरिकांनी सहभाग नोंदवला.

या शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मे वाटप, मोफत औषधे, शुगर तपासणी, रक्तदाब तपासणी, स्त्रीरोग तपासणी, अस्थिरोग तपासणी, त्वचारोग तपासणी यासह विविध तपासण्या अगदी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच ९१७ नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तर १४ नागरिकांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन देखील या शिबिरात मोफत रित्या करण्यात आले.

स्टेप्स फाउंडेशन या अनाथ विद्यार्थी संस्थेला शैक्षणिक मदत म्हणून ५ विद्यार्थीची जबाबदारी श्री निलेशदादा नेवाळे सोशल फाउंडेशन तर्फे घेण्यात आली. तसेच मराठवाडा, सोलापूर जिल्ह्यातील पुरग्रस्त भागात ५० पोती तांदूळ आणि ५० पोती गहू पाठवून श्री निलेशदादा नेवाळे सोशल फाउंडेशन तर्फे मदतीचा हात देण्यात आला.

निलेश नेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, उद्योजक कार्तिक लांडगे, कामगार नेते इरफान सय्यद, विष्णुपंत नेवाळे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, दत्तात्रय वाघेरे, माजी नगरसेवक राहुल कलाटे, एकनाथ पवार, निलेश बारणे, जितेंद्र ननावरे, उत्तम केंदळे, सुरेश तात्या म्हेत्रे, कुंदन गायकवाड, सुजित पाटील, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहत निलेश नेवाळे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रभाग ११ मधील भाजपाचे सर्व पदाधिकारी, टाळगाव चिखली मधील ग्रामस्थ आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.






















Join Our Whatsapp Group