
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांच्या हद्दीत विविध कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेले तब्बल २३ कोटी ३० लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ पिंपरी चिंचवड पोलिसांनी नष्ट केले आहेत. यात मॅफेड्रॉन आणि गांजाचा जप्त केला साठा होता.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये दाखल असलेल्या एन.डी.पी.एस. गुन्ह्यांमधील मुद्देमाल नाश करणे तसेच पिंपरी चिंचवड शहरामध्ये अंमली पदार्थाचे अवैध विक्रीवर आळा घालण्याकरीता आणि अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करणेबाबत आदेश दिले होते.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार दि.२९/०९/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा पिंपरी चिचंवड, प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, पुणे, राज्य उत्पादन शुल्क, पुणे व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत रांजणगाव एम.आय.डी.सी. येथील भट्टीमध्ये ९० गुन्ह्यातील ६६२.४५५ किलो गांजा (किंमत सुमारे ३ कोटीज्ञ३१ लाख २२ हजार ७५० रुपये) व १९.९९७ किलो मॅफेड्रॉन (किंमत सुमारे १९ कोटी ९९ लाख ७० हजार रुपये) असा एकुण २३ कोटी ३० लाख ९२ हजार ७५० रुपये किंमतीचा अंमली पदार्थ मुद्देमाल जाळुन नाश करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल चव्हाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक शकुर तांबोळी, स्वामीनाथ जाधव, महिला पोलीस हवालदार शिल्पा काबंळे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर मुळे, प्रसाट कलाटे, निखिल शेटे, संतोष स्वामी, पोलीस शिपाई रणधीर माने, कपिलेश इगवे, मितेश यादव, सुभाष गुरव, संतोष सपकाळ, चंद्रकात जाधव, चितांमण सुपे यांनी केली आहे.
























Join Our Whatsapp Group