माजी नगरसेविका मीनलताई विशाल यादव यांच्यावतीने आयोजन
पिंपरी (Pclive7.com):- दीपावलीचा पहिला सण म्हणजे ‘वसुबारस’.. गोमाता व वासराची पूजा करून दिवाळीच्या सणाची सुरूवात होते. त्यानिमित्त मोहननगर, काळभोर नगर प्रभाग क्रमांक १४ येथे बालब्रह्मचारी सिदाजी आप्पा चौक (गाय वासरू चौक) येथे वसुबारस निमित्त गोमाताचे पूजन आणि दीपोत्सव सोहळ्याचे शुक्रवार दि.१७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजन माजी नगरसेविका मीनलताई यादव आणि शिवसेना विभाग प्रमुख विशाल यादव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

याबाबत बोलताना माजी नगरसेविका मीनलताई यादव म्हणाल्या की, गाय आणि वासराचे पूजन ही भारतीय संस्कृतीतील एक श्रद्धेची बाब आहे. गोमातेचे केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. या वर्षी वसुबारस साजरी करताना नागरिकांनी केवळ पूजनापुरते मर्यादित न राहता, वर्षभर गोरक्षणासाठी कार्य करावे.

मोहननगर येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या बालब्रम्हचारी सिदाजी आप्पा चौकातील गाय वासरू शिल्पाचे पूजन प्रभागातील सर्व महिलांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी ‘दीपउत्सव’ देखील साजरा करण्याचे आयोजिले आहे. तरी मोहन नगर काळभोर नगर प्रभाग क्रमांक 14 येथील सर्व महिलांनी शुक्रवार दि.१७ सायंकाळी ७ वाजता चौकात उपस्थित राहावे. या पूजनानंतर सर्वना ‘बुंदी वाटपाचा’ कार्यक्रम देखील करण्यात येणार असून जास्तीत जास्त महिलांनी या वेळी उपस्थित राहावे असे आवाहन मीनलताई यादव यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group