
पिंपरी (Pclive7.com):- रस्त्यावरून जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने अचानक पेट घेतला. मात्र कार चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे कार मध्ये बसलेल्या प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. पिंपळे गुरव येथेही घटना घडली.

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील कल्पतरू सोसायटी जवळ रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारणे अचानक पेट घेतला. कार मध्ये आग लागल्याची जाणीव होताच कार चालकाने रस्त्याच्या बाजूला आपली कार थांबवून कारमध्ये बसलेल्या प्रवासांना खाली उतरविल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून कारला लागलेली आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळे कारला आग लागली असावी असा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे.























Join Our Whatsapp Group