पिंपरी (Pclive7.com):- दुकानाच्या पाठीमागील पत्रे उचकटून आत प्रवेश करत चोरट्यांनी २ लाख ७२ हजार रुपये किंमतीचा तांब्याचा माल (कॉपर बॉटल्स) चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार काळेवाडीतील ज्योतिबा गार्डन परिसरातील बालाजी ट्रेडर्स या दुकानात घडला.

राहुल पांडुरंग इंगवले (२५, रा. पत्राशेड, लिंक रोड, परिवर्तन सोसायटी, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अमर शंकर दुसेजा (३०, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी शनिवारी (दि.६) काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींच्या दुकानाच्या मागील बाजूस असलेला पत्रा उचकटून अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश केला. त्यानंतर त्यांने दुकानातील २ लाख ७२ हजार रुपये किंमतीचा तांब्याचा माल चोरून नेला. काळेवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.























Join Our Whatsapp Group