पिंपरी (Pclive7.com):- अबकड आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी या मागणीसाठी आमदार अमित गोरखे यांनी वेगळा पोशाख परिधान करून नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.

अबकड समाजाच्या हक्कांच्या मागणीसाठी आणि राज्य सरकारने आरक्षण लागू करण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, यासाठी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर युवा आमदार अमित गोरखे व आमदार जितेश अंतापूरकर यांनी आंदोलन करून आवाज बुलंद केला. आमदार कृपाल तुमाने व आमदार काळे ही सहभागी झाले होते.

५९ जाती व वंचित समाजाच्या न्याय्य हक्कासाठी सुरू असलेला हा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केला.























Join Our Whatsapp Group