पिंपळ सौदागर (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील प्रभाग क्रमांक २८ रहाटणी–पिंपळे सौदागर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज रविवार (दि.२१) रोजी भव्य प्रचार शुभारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रचाराचा शुभारंभ सायंकाळी ५ वाजता ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराज मंदिर, पिंपळे सौदागर येथे होणार आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून आगामी महापालिका निवडणुक प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात येणार आहे. या प्रचाराचा भव्य शुभारंभ कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी नगरसेविका सौ. शितल विठ्ठल (नाना) काटे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. मीनाक्षी अनिल काटे तसेच सौ. सायली उमेश काटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

यावेळी प्रभाग क्रमांक २८ मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित असे आवाहन विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group