पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळवडे – रुपीनगर – त्रिवेणी नगर प्रभाग क्रमांक १२ मध्ये “आपुलकीचा, विश्वासाचं.. आपल्या लोकांनी बनवलेलं.. आपलं पॅनल” भारतीय जनता पक्षाचा गुरूवारी (दि.२५) भव्य प्रचार शुभारंभ करण्यात येणार आहे.

भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या शुभहस्ते प्रचाराचा नारळ फोडून प्रचार पदयात्रेची सुरुवात करण्यात येणार आहे. गुरुवार दि.२५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता श्री भैरवनाथ महाराज मंदिर, तळवडे गावठाण येथून या प्रचार पदयात्रेचा प्रारंभ होणार आहे.

यावेळी प्रभागातील भाजपाचे उमेदवार प्रविण महादेव भालेकर (ओबीसी पुरुष), सौ. शीतलताई धनंजय वर्णेकर (सर्वसाधारण महिला), सौ. शिवानीताई दादासाहेब नरळे (सर्वसाधारण महिला) तसेच शांताराम भालेकर (एस. के. बापू – सर्वसाधारण पुरुष) यांच्या प्रचाराचा शुभारंभ यावेळी होणार आहे. प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत भाजपच्या विकासकामांचा लेखाजोखा मांडण्यात येणार आहे.

























Join Our Whatsapp Group