पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १४ काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, आकुर्डी गावठाण, तुळजाईवस्ती, दत्तवाडी प्रभागाचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांनी केलेल्या विकास कामांची माहिती असलेल्या दिनदर्शिकेचे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर प्रभागातील झालेल्या कामांची माहिती देण्यात आली आहे.

यावेळी माजी नगरसेवक प्रमोद कुटे, मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाचे संचालक फारुख शेख, युवा नेते सिद्धार्थ बनसोडे, युवा नेते योगेश बाबर, मंगेश कुटे, विवेक देशमुख, रोशन जगताप उपस्थित होते.
प्रमोद कुटे यांनी मागील पंचवार्षिकमध्ये महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करुन प्रभागातील विविध विकास कामे मार्गी लावली. प्रभागात शंभर खाटांचे कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय सुरु केले. याचा प्रभागातील मध्यमवर्गीय, गोरगरीब कुटुंबातील नागरिकांना मोठा फायदा होत आहे. कमी पैशांत दर्जेदार उपचार मिळत आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला. श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करणारी कमान उभारली. प्रभागातील मुख्य आणि अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे केले. पदपथावर पेव्हिंग ब्लॉक बसविले. कै. मल्हारराव कुटे अध्यात्मिक व सांस्कृतीक भवन, समाजभूषण डॉ. नानासाहेब धर्मादारी उद्यानाची निर्मिती केली. बौद्ध बांधवांसाठी सुसज्ज भगवान गौतम बुद्ध विहार,आकुर्डी चौकाचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक नामकरण, प्रभागात गॅस वाहिनीची फिटिंग करुन दिली. नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मोफत चष्मे वाटप केले. ही सर्व कामे दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर दिली आहेत.

प्रभागाच्या सुरक्षिततेसाठी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे..
प्रभागात शांतता रहावी.प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रमोद कुटे यांनी स्वखर्चाने चौका-चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले.गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही कॅमेरे बसवून दिले.

याबाबत प्रमोद कुटे म्हणाले, मागील पंचवार्षिकमध्ये प्रभागाचा सर्वांगीण आणि समतोल विकास केले. प्रभागातील उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी पुन्हा मी निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे. प्रभागातील जनता मला पुन्हा संधी देईल,असा ठाम विश्वास आहे.






















Join Our Whatsapp Group