पिंपरी (Pclive7.com):- आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीकडून प्रभाग क्रमांक २६ साठी अधिकृत उमेदवार म्हणून रविराज बबन काळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरीत्या दाखल केला.

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या ड प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात सकाळी उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला. यावेळी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांततापूर्ण आणि उत्साही वातावरणात हा अर्ज दाखल करण्यात आला.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रविराज बबन काळे यांनी सांगितले की, “माझी जनता हीच माझी खरी ताकद आहे. प्रभागातील सामान्य नागरिकांचे प्रश्न, दैनंदिन अडचणी आणि मूलभूत सुविधा यासाठी मी कायम रस्त्यावर उतरून काम केले आहे. आता लोकांच्या विश्वासावर उमेदवारी अर्ज दाखल करत असून, हा लढा केवळ निवडणुकीसाठी नसून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे.”

ते पुढे म्हणाले की, आम आदमी पार्टीच्या धोरणांनुसार पारदर्शक प्रशासन, भ्रष्टाचारमुक्त कारभार, स्वच्छ परिसर, मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी संधी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण हेच त्यांच्या कामाचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही विश्वास व्यक्त केला की, प्रभाग क्रमांक २६ मधील नागरिकांनी आतापर्यंत दिलेला पाठिंबा आणि प्रेम यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आम आदमी पार्टीला निश्चित यश मिळेल. प्रभागातील नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण आणि सार्वजनिक सुरक्षेच्या प्रश्नांवर ठोस काम करण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
श्री. रविराज बबन काळे हे आम आदमी पार्टीचे पिंपरी–चिंचवड शहराध्यक्ष असून, सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणारे आणि जनतेशी थेट संवाद ठेवणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.






















Join Our Whatsapp Group