पिंपरी (Pclive7.com):- मी नेहमीच सर्व जाती धर्मातील लोकांना, वंचितांना बरोबर घेऊन काम केले. भविष्यातही सर्वांना बरोबर घेऊन काम करू असे प्रतिपादन माजी नगरसेवक व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे यांनी येथे केले.

राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग क्रमांक 21 मधून संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व निकिता कदम यांना उमेदवारी दिली आहे. या पॅनलच्या वतीने आज पदयात्रा काढण्यात आली. काळेवाडी पुलाजवळील मशिदीमध्ये नमाज पढण्यासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांचीही यावेळी वाघेरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांनी भेट घेतली. व त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी वाघेरे म्हणाले की, मी आजवर सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम केले. कोरोना काळात रुग्णांना मदत व्हावी म्हणून स्वखर्चातून 75 लाखाचे बेड व्हेंटिलेटर मशीन आदी वैद्यकीय साहित्य जिजामाता रुग्णालयाला दिले. पिंपरी गावचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. नदी सुधार प्रकल्पासाठी पाठपुरावा केला. मिलिटरी डेअरी फॉर्म उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावला. वंचित घटकांसाठी ही काम केले. 22 दिव्यांग मुलांना कृत्रिम पाय बसवून दिले. भविष्यातही सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम करू. त्यासाठी पॅनेल मधील सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन वाघेरे यांनी या पदयात्रे दरम्यान केले. या पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Tags: Sandeep Waghere
























Join Our Whatsapp Group