पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने पिंपरी शहरात एक महत्त्वाचा राजकीय इतिहास घडवला आहे. आमदार अमित गोरखे तसेच उद्योजक उमेशभाऊ चांदगुडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक १०-ब मधून सौ. सुप्रिया ताई चांदगुडे या भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या महिला उमेदवार बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत.

‘शतप्रतिशत भाजप’ तसेच ‘अबकी बार १०० पार’ या संकल्पासह भाजपाने महानगरपालिकेतील सत्तेसाठी आपली तयारी अधिक भक्कम केली असून, या बिनविरोध निवडीमुळे भाजपाची संघटनात्मक ताकद आणि नागरिकांचा विश्वास भाजपा प्रति शत पटीने वाढला आहे.

या बिनविरोध निवडीनंतर आमदार अमित गोरखे यांच्या कर्तव्यपथ येथील जनसंपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी तसेच प्रभाग क्रमांक १० मधील उमेदवारांच्या वतीने फटाके फोडून, पुष्पगुच्छ देत आणि घोषणाबाजी करून सौ. सुप्रियाताई चांदगुडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
याचप्रमाणे, प्रभाग क्रमांक ६ मधून रवी लांडगे हे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले असून, हा देखील भाजपासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी–चिंचवडमध्ये भाजपाची वाटचाल अधिक वेगाने सुरू असून, आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप ऐतिहासिक यश मिळवणारच, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
























Join Our Whatsapp Group