चिंचवड (Pclive7.com):- मोहन नगर, काळभोर नगर व आकुर्डी परिसरातील प्रभाग क्रमांक १४ मधील भाजपा–आरपीआय (आठवले गट) पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. कैलास कुटे, श्री. प्रसाद शेट्टी, सौ. मीनलताई विशाल यादव व ऐश्वर्याताई बाबर यांच्या प्रचाराची सुरुवात चिंचवड स्टेशन येथील हजरत जमील अहमद बुखारी चिंचवड स्टेशन दर्गा देवस्थान येथे चादर व फुलांची माळ अर्पण करून करण्यात आली.

यावेळी समस्त मुस्लिम समाजासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. समाजातील सर्व मौलाना तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन विकासाच्या मार्गावर प्रभागाला पुढे नेण्याचा संकल्प उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला.

धर्म, जात, पंथ यापलीकडे जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू, असा विश्वास उमेदवारांनी उपस्थितांना दिला. प्रचाराच्या सुरुवातीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

























Join Our Whatsapp Group