पिंपरी (Pclive7.com):- वाकड–ताथवडे–पुनावळे परिसरातील प्रभाग क्रमांक २५ मधून भाजपा आरपीआयच्या अधिकृत उमेदवार सौ. श्रुती राम वाकडकर यांनी निवडणूक रिंगणात उतरून प्रचाराला वेग दिला आहे. “तुमची आमची भाजप सर्वांची” या संकल्पनेतून त्या नागरिकांशी थेट संवाद साधत असून, परिसरातील विकासकामे, मूलभूत सुविधा आणि जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडत आहेत.

सौ. श्रुती राम वाकडकर यांनी प्रभागात होम टू होम मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचारावर भर दिला आहे. त्या गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात सक्रिय असून, विश्वासार्ह व नेहमी उपलब्ध असणाऱ्या जनसेविका म्हणून त्यांची ओळख आहे. रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वाहतूक, सुरक्षा तसेच स्मार्ट प्रभाग उभारणीसाठी ठोस आराखडा त्यांनी मांडला आहे. “प्रभागाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास हेच माझे ध्येय,” असल्याचा विश्वास त्या मतदारांना देत आहेत.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन आणि स्थानिक नागरिकांचा वाढता पाठिंबा यामुळे प्रभागात उत्साहाचे वातावरण आहे. आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २५ मधून सौ. श्रुती राम वाकडकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

























Join Our Whatsapp Group