राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा विश्वास
पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १४ काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, आकुर्डी गावठाण, तुळजाईवस्ती, दत्तवाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जेष्ठ नेते, माजी महापौर आझमभाई पानसरे सक्रिय झाले आहेत. आझमभाई यांनी प्रचाराची सूत्रे हाती घेतली असून या प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास पानसरे यांनी व्यक्त केला.

उमेदवार माजी नगरसेवक प्रमोद कुटे, विशाल काळभोर, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, अरुणा लंगोटे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते झिशानभाई सय्यद, दिलीप दातीर-पाटील, अमोल गाडेकर यावेळी उपस्थित होते. काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, आकुर्डी गावठाण, तुळजाईवस्ती, दत्तवाडी, चिंचवड स्टेशन या भागात आझमभाई पानसरे यांचे वर्चस्व आहे. त्यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. या भागातील नागरिक थेट त्यांच्याशी जोडले आहेत. या प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांच्या प्रचाराचा आझमभाई यांनी आढावा घेतला. प्रचाराची रणनीती सांगितली. येथे स्वतः आझमभाई यांनी लक्ष घातले असून सूत्रे हाती घेतली आहेत. चारही उमेदवारांना विजयासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

आझमभाई पानसरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार अनुभवी आहेत. प्रमोद कुटे आणि वैशाली काळभोर यांनी नगरसेवक असताना प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला. विशाल काळभोर हे सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. अरुणा लंगोटे यांचे पती गणेश लंगोटे यांचे प्रभागात सामाजिक कार्य आहे. चारही उमेदवारांकडे प्रभागाच्या विकासाचे व्हिजन आहे. व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन काम करत आहेत. त्यामुळे प्रभागातील मतदार नक्कीच या चारही उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. चौघेही मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन महापालिका सभागृहात दिसतील असा विश्वास आझमभाई यांनी व्यक्त केला.
प्रभागात प्रचारादरम्यान नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. जेष्ठ नेते आझमभाई पानसरे यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांची साथ आहे. त्यामुळे प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदार नक्कीच महापालिका सभागृहात पाठवतील असा विश्वास चारही उमेदवारांनी व्यक्त केला.






















Join Our Whatsapp Group