पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी प्रभाग क्रमांक 21 मधील ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सभागृहामध्ये ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे दुःखद निधन झाल्याने शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नगरसेवक संदिप वाघेरे यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. शहरातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, शिक्षण, आरोग्य तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे वाघेरे यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड शहराच्या प्रगतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यांच्या जाण्याने राज्याने एक दूरदृष्टी असलेले नेतृत्व गमावले असल्याची खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमास नगरसेवक हिरानंद आसवानी, निकिता कदम, प्रियांका कुदळे, गिरिजादेवी कुदळे, दीपिका कापसे, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष वसंत तावरे, सुधाकर यादव, स्वामी सर, कैलास भुजबळ, तसेच सामाजिक कार्यकर्ते शेखर अहिरराव, राजेंद्र वाघेरे, किशोर येळवंडे, राकेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group