मुंबई (Pclive7.com):- लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांच्या पगडी आणि पागोट्यावरुन राजकारण करणाऱ्यांना डोकं आहे का? अशा तीव्र शब्दांमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अत्रे पुरस्काराचे उध्दव ठाकरे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी थेट शरद पवारांनाच लक्ष केले.
यावेळी ठाकरे म्हणाले की, आजच्या घडीला काही नेते महापुरुषांच्या पगडीचे राजकारण करत आहे. राजकारण करणाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का? पगड्यांपेक्षा त्या परिधान करणाऱ्या व्यक्तींच्या विचारांनी पुढे जायला हवे. लोकमान्य टिळकांनी ‘इंग्रज सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारला होता. पवारांना तो प्रश्नदेखील विचारता येत नाही. कारण डोकं ठिकाणावर असायला आधी डोकं असावं लागते. पवारांना डोकं नावाचा प्रकार आहे की, नाही असा टोला उध्दव ठाकरेंनी लगावला आहे.
शरद पवारांवर जोरदार टीका केल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी आपला मोर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वळवला. देशातील प्रसारमाध्यमे सध्या अघोषित आणीबाणीचा सामना करत आहेत. वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य हिरावून घेणारी दुसरी आणीबाणी येत आहे, ती मोडून काढा, असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले. मोदी सरकारच्या जाहिरातीतील फोलपणा जनतेसमोर आणणाऱ्या पत्रकारांना घरचा रस्ता दाखवला जात आहे.





















Join Our Whatsapp Group