मुंबई (Pclive7.com):- ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आला होता. फुफ्फुसांच्या त्रासामुळे त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली होती. त्यांना शनिवारी संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली होती. अखेर रविवारी 12 एप्रिल 2026 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. 13 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 साली झाला. या भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज पार्श्वगायिका म्हणून त्या लोकप्रिय होत्या. ज्यांची कारकीर्द सात दशकांहून अधिक काळ चालली आहे. त्यांनी 20 हून अधिक भाषांमध्ये 12 हजारहून अधिक गाणी गायली असून, त्यांच्या अष्टपैलू गायनासाठी (रोमँटिक ते गझल, कॅबरे ते शास्त्रीय) त्या प्रसिद्ध आहेत. आशा भोसले यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

8 दशकांपेक्षा जास्त काळ चाललेल्या कारकीर्दीत त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी अशा अनेक भाषांमध्ये हजारो गाणी रेकॉर्ड केली आहेत. तसेच आशाजींनी बॉलिवूडमधील ‘दम मारो दम’, ‘पिया तू अब तो आजा’, ‘चुरा लिया है तुमने’ यांसारख्या आयकॉनिक गाण्यांपासून ते गझल, भजन, आणि भावगीतांपर्यंत सर्व प्रकारच्या गाण्यांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. आशा भोसले यांच्या नावे जागतिक विक्रम नोंदवण्यात आले आहेत. 2011 मध्ये, ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने त्यांना संगीताच्या इतिहासातील सर्वात जास्त गाणी रेकॉर्ड करणारी कलाकार म्हणून मान्यता दिली.

ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय गायिका
आशा भोसले या ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय गायिका होत्या. त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. या गायिकेने २० हून अधिक भाषांमध्ये गायन केले.





















Join Our Whatsapp Group