पिंपरी (Pclive7.com):- मैत्रिणीसोबत हातगाडीवर पाणीपुरी खाणा-या तरुणीकडे एकटक पाहणा-या बुलेट राजाला निगडी पोलीसांनी अटक केली आहे. हा प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील निगडी, यमुनानगर येथे घडला.
रमेश दादाराव जाधव (वय ३०, रा. गणेशनगर, पंचशिल कॉलनी, थेरगाव), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत यमुनानगर येथील पाणीपुरीच्या हातगाडीवर पाणीपुरी खात थांबली होती. यावेळी आरोपी रमेश (एमएच १४, डीआर २४६९) या क्रमांकाच्या बुलेटवरून त्यांच्यासमोर येऊन फिर्यादीकडे एकटक पाहत डोळ्यांनी इशारा करत होता. यापूर्वीही आरोपीने फिर्यादीचा भररस्त्यात हात धरून विनयभंग केला होता. आरोपी रमेशच्या त्रासाला कंटाळलेल्या तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. तक्रारीनंतर पोलीसांनी आरोपीला त्वरीत गजाआड केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक आरदवाड अधिक तपास करत आहेत.





















Join Our Whatsapp Group