पिंपरी (Pclive7.com):- उन्हाळ्यात उन्हाच्या झळा व पाऊसाळ्यामध्ये भर पाऊसात पोलीस आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत असतात. पोलीसांप्रती असलेल्या सामाजिक भावनेतुन ऊन आणि पाऊसापासून संरक्षण होण्यासाठी वडगाव मावळ वाहतुक पोलीसांना पोलीस फ्रेन्डस् असोसिएशनच्या वतीने छत्री वाटप करण्यात आले.
यावेळी वडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक डी.एस.हाके, साळुंके, मावळ पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम बाप्पु कदम, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे, चौधरी, संदिप कल्हाटकर, रवी पवार, अमोल कोंडे, युवराज चिंचवडे, सनी अरगडे, शुभम चिंचवडे, अक्षय पवार, निखिल कलाटे,रमेश पिचड, अभिषेक जाधव, बालाजी गाडले, पोलिस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन पदाधिकारी व सभासद मान्यवर उपस्थित होते.
वरिष्ठ पोलीस निरिक्षक डी.एस.हाके यांनी पोलीसांसाठी राबवत असलेल्या उपक्रमाचे स्वागत केले. सभापती गुलाबराव म्हाळसकर व उपसभापती शांताराम बाप्पु कदम यांनी मनोगत व्यक्त करुन संघटनेच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. पोलीसांप्रती असलेल्या सामाजिक भावनेतुन असोसिएशन विविध प्रकारचे उपक्रम छत्री वाटप, स्वस्तातील घरे, आरोग्य शिबिर, शालेय साहीत्य, सामाजिक उपक्रम मावळ तालुक्यातील पोलीस कुटुंबासाठी राबविणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष गजानन चिंचवडे यांनी प्रास्ताविक मध्ये सांगितले. सुत्रसंचलन मंगेश शेलार यांनी केले. व सर्वांचे आभार नगरसेवक किरणभाऊ म्हाळसकर यांनी मानले.