पिंपरी (Pclive7.com):- रावेत बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे अशुद्ध जल उपसा केंद्रातील काही पंप्स काही कालावधीसाठी बंद ठेवावे लागल्याने पाण्याचा उपसा नेहमीपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.
उद्या (बुधवारी दि.२६) रोजी देखील पाणी पुरवठासुद्धा विस्कळीत व कमी दाबाने राहणार आहे, असे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.
पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी विभाग क्रियाशील आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी व उपलब्ध पाणी जपून वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.






















Join Our Whatsapp Group