पिंपरी (Pclive7.com):- निगडी जकात नाका येथे असणा-या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बी.आर.टी बस स्थानक येथे सिमाभिंत नसल्या कारणाने तेथे अपघातांची मालिका वाढत आहे.त्यामुळे त्या बसस्थानकाच्या येथे सिमाभिंत बांधण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.
याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्र.१३ मधील निगडी जकात नाका येथे असणा-या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बी.आर.टी बस स्थानकाचे अलिकडेच महापालिकेच्या वतीने उद्घाटन करण्यात आले असून सदर बसस्थानक चालू करण्यात आले. त्या ठिकाणी निगडी, यमुनानगर, रूपीनगर, प्राधिकरण, देहूरोड अशा विविध ठिकाणांवरून नागरीक वर्ग हा आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी येत असतो, निगडीचे मुख्य बसस्थानक असल्या कारणाने तेथे प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परंतू त्या ठिकाणी सिमा भिंत नसल्या कारणाने खाजगी वाहने सर्रासपणे बसस्थानकाच्या येेथून भरघाव वेगाने ये-जा करीत असतात. ही वाहने बसच्या मार्गात आल्यामुळे तेथे वारंवार अपघात घडत आहे. शॉर्टकटच्या नादात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनांमुळे तेथे असणारे बस चालक, प्रवाश्यांची सुरक्षाही अनेकदा धोक्यात येते आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सिमा भिंत बांधली गेल्यास तेथे चुकीच्या पध्दतीने चालणा-या वाहतूकीला आळा बसेल. त्या अनुषंगाने सदर बाबीची गांभिर्यपुर्वक दखल घेऊन सिमाभिंत बांधण्यात यावी, अशी मागणी खैरनार यांनी केली आहे.
निगडी बस स्थानकाला सिमाभिंत बांधण्याची दिपक खैरनार यांची मागणी





















Join Our Whatsapp Group