पिंपरी (Pclive7.com):- शिवशाही व्यापारीसंघ महाराष्ट्र राज्यच्या उल्हासनगर विभाग क्रमांक २ महात्मा गांधीनगर विभागाच्या विभाग प्रमुखपदी कृष्णा आभिमान गायकवाड यांची निवड करण्यात आली. शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेशअध्यक्ष युवराज दाखले यांनी पिंपरी चिंचवड शहर या ठिकाणी निवडीचे पञ दिले.
यावेळी प्रदेश सचिव गणेश आहेर यांनी नवनियुक्त विभागप्रमुख कृष्णा गायकवाड यांना शिवशाही व्यापारीसंघ उल्लासनगर मध्ये वाढविण्याच्या संदर्भात तसेच व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रत्नशिल राहण्याच्या सुचना देऊ शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील, दत्ता क्षिरसागर,बाळासाहेब गायकवाड ,मारूती मस्के आदी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group