पिंपरी (Pclive7.com):- ११ ऑक्टोबर हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा तसेच शहराचा ३६ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. या दिनाचे औचित्य साधून शहरातील खवय्यांसाठी ‘पीसीएमसी ईट आऊट’ (PCMC Eat Outs) या नावाने सोशल व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. त्याचा गुरूवारी शुभारंभ करण्यात आला. यापूर्वी ‘पुणे ईट आउट’च्या (Pune Eat Outs) माध्यमातून पुणेकरांना विविध खाद्यपदार्थांबाबत माहिती मिळत होती. आता त्याच संकल्पनेतून प्रेरणा घेऊन पिंपरी चिंचवड शहरातील युवकांनी ‘पीसीएमसी ईट आऊट’ सुरू केले आहे.

‘पीसीएमसी ईट आऊट’ हा फेसबुक ग्रुप खाद्यप्रेमींचा ग्रुप आहे. ज्यामध्ये खवय्ये, ब्लॉगर, फूड फोटोग्राफर तसेच रेस्टॉरंट व्यावसायिकांना एकमेकांशी संवाद साधता येणार आहे. या माध्यमातून शहराची नवीन ओळख प्रस्थापित करण्याचा युवकांचा मानस आहे. शहराबाहेरून येणाऱ्या लोकांनाही या सोशल ग्रुपच्या माध्यमातून शहरातील उत्तमोत्तम खाद्यपदार्थांच्या ठिकाणांची माहिती मिळणे सोईस्कर ठरणार आहे.
शहराच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून ‘पीसीएमसी ईट आऊट’ हा एक नवीन सामाजिक उपक्रम खास पिंपरी चिंचवड करांसाठी सुरू करण्यात येत आहे. यासाठी ‘पीसीएमसी फर्स्ट’ (PCMCFirst) या सामाजिक ग्रुप ने सहकार्य केले आहे. Happy Eating, Spread Positivity! हा या ग्रुपचा नारा आहे, ग्रुपमध्ये आजच जॉईन व्हा असे आवाहन या ग्रुपच्या तरूणांनी केले आहे.
‘पीसीएमसी ईट आऊट’
ग्रुपची लिंक – https://www.facebook.com/




















Join Our Whatsapp Group