पिंपरी (Pclive7.com):- दिवंगत महापौर मधुकर पवळे प्रतिष्ठान निगडी यांच्यावतीने सालाबादप्रमाणे दीपावली पाडवा सणानिमित्त भक्ती शक्ती समूहशिल्प उद्यान निगडी येथे दीपोत्सवाचे गुरुवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजता आयोजन केले आहे.
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, उद्योजक किरण चोपडा, महापौर राहुल जाधव,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी १५ हजार दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. तसेच विद्युत रोषणाई, उडते आकाशदिवे, फटाक्यांची आतषबाजी, भव्य रांगोळी काढण्यात येणार आहे. दीपोत्सवाचे यंदाचे १७ वे वर्ष आहे. कार्यक्रमाचे संयोजन नगरसेविका सुमनताई पवळे, माजी नगरसेवक दत्तात्रय पवळे, संतोष कवडे यांनी केले आहे.























Join Our Whatsapp Group