पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगाव प्रभाग क्रमांक २१ मधील नियोजित कामांचा पाहणी दौरा भाजपाचे नगरसेवक संदिप वाघेरे यांनी आज केला. यावेळी पिंपरी महापालिकेतील संबंधित विभागाचे सर्वच अधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित होते. या दौऱ्यात प्रभागाच्या नियोजन बध्द विकासासाठी संदिप वाघेरे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
पिंपरी येथील प्रभाग क्रमांक २१ मधून पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवक संदिप वाघेरे यांनी गेल्या दिड वर्षात आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली आहे. महापालिकेमार्फत या प्रभागात विविध ठिकाणी विकास कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी पिंपरी परिसराचा नियोजन बद्ध विकास करणेकामी प्रभाग पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार माळी आळी, शिंदे आळी, वाघेरे आळी, न्हावी आळी, वाघेरे कॉलोनी नं.१,२,३, भैरवनाथ नगर, गीता निवास, बोट क्लब, संकल्प मित्र मंडळ ते बोट क्लब, पिंपरीगाव ते काळेवाडी पूल, काशिबा शिंदे सभागृह, पिंपरीगाव ते स्मशानभूमी, समृद्धी हॉटेल ते शिवछत्रपती चौक, बालामल चाळ, १०० फुटी रोड, भैरवनाथ मंदिर, शिवाजी पुतळा, नवमहाराष्ट्र विदयालय रोड, अशोक थिएटर परिसर, बालभवन परिसर, दुर्गा माता मंदिर ते गेलार्ड चौक, शास्त्री गार्डन ते बलदेव नगर, गेलार्ड चौक ते साई चौक, साई चौक ते राधिका चौक, मिलिंदनगर, आदर्शनगर, जिजामाता हॉस्पिटल, वैभवनगर परिसर इत्यादी परिसराची पाहणी करण्यात आली.
या पाहणी दौऱ्यात महापालिकेच्या स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता मोमीन, जलनिस्सारण विभागाचे उपअभियंता महाजन, कनिष्ठ अभियंता सचिन मगर, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आहेर, कनिष्ठ अभियंता स्वप्नील शिर्के, विद्युत विभागाचे धुमाळ साहेब, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघेरे, संजय गायके सहभागी झाले होते.






















Join Our Whatsapp Group