पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील विठ्ठल रुक्मिणी वारकरी संस्थे तर्फे आयोजित सुवर्ण महोत्सव काकड आरती सप्ताह निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व गाथा भजन सोहळ्याचे आळंदी-पंढरपूर वारीचे वंशपरंपरागत चोपदार हभप डॉ. बाळासाहेब चोपदार, हभप डॉ. नारायण महाराज जाधव, महंत पुरषोत्तम महाराज पाटील (आळंदीकर) नगरसेवक नाना काटे, शत्रुघ्न काटे, नगरसेविका शितल काटे, निर्मला कुटे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन तसेच गाथा पूजन व विणापुजन करून सप्ताह सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला.

यावेळी आळंदी-पंढरपूर वारीचे वंशपरंपरागत चोपदार हभप डॉ. बाळासाहेब चोपदार, हभप डॉ. श्री नारायण महाराज जाधव, महंत पुरषोत्तम महाराज पाटील (आळंदीकर) यांचा यावेळी नगरसेवक नाना काटे व पिंपळे वारकरी संस्थेचे अध्यक्ष संदेश काटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी विठ्ठल रुक्मिणी वारकरी संस्थेचे आजी माजी पदाधिकारी तसेच शिव शंभो सेवा मंडळाचे सर्व आजी माजी पदाधिकारी व गावकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.
दि.२४ नोव्हेंबर ते रविवार १ डिसेंबर दरम्यान सोहळा होणार आहे. यामध्ये विविध नामवंत किर्तनकारांचे कीर्तन तसेच विविध महिला भजनी मंडळातर्फे भजन कार्यक्रम होणार आहेत.






















Join Our Whatsapp Group