
नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांच्या पुढाकारातून बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तू, सुरक्षा संचचे मोफत वाटप
पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसरात समाजोपयोगी उपक्रम राबवून अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात पार पडला. प्रभाग क्रमांक २५ मधील गरजू बांधकाम कामगारांसाठी कामगार कल्याण मंडळाच्या वतीने तसेच नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांच्या पुढाकारातून गृहउपयोगी वस्तू, अत्यावश्यक संच आणि सुरक्षा संच यांचे मोफत वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक राहुल कलाटे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, रिपाईच्या महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे, नगरसेविका स्नेहा कलाटे, रेश्मा भुजबळ, आरती चोंधे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच साम्राट जकाते, सिकंदर सूर्यवंशी, विनोद चांदमारे, विलास पाटील, विशाल वाव्हळकर, आशिष थोरात, संतोष डेंगळे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत सुमारे १२५ गरजू कुटुंबांना साहित्याचे वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी कुणाल वाव्हळकर यांच्या समाजाप्रती असलेल्या निष्ठेचे आणि कार्यतत्परतेचे कौतुक केले.

यावेळी राहुल कलाटे म्हणाले की, “नगरसेवक झाल्यानंतरही कुणाल वाव्हळकर यांची समाजाशी असलेली नाळ तुटलेली नाही. सर्वसामान्यांच्या आनंदात रमणे हेच खरे मोठे पद आहे.” त्यांनी पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा देत आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमाचे विशेष कौतुक केले. या उपक्रमामुळे गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून सामाजिक बांधिलकी जपणारा हा कार्यक्रम ठरला आहे.






















Join Our Whatsapp Group