पिंपरी (Pclive7.com):- शिरूर लोकसभेची उमेदवारीविलास लांडे यांनाच द्या असं सांगत लांडे यांच्या नावाचा जयघोष भोसरीतील राष्ट्रवादीच्या सभेत सुरु होता. त्यावेळी अजित पवारांच्या भाषणात व्यत्यय येत होता. त्यावेळी ‘आवाज करू नका, नायतर तिकीटचं कापून टाकील.. अजित पवार म्हणतात मला…! असं म्हणत शिरूरची उमेदवारी विलास लांडे यांना देणार असल्याचे अजित पवारांनी संकेत दिल्याची चर्चा रंगू लागली आहे.
शिवसेनेचे उपनेते अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर भोसरीत त्यांच्या उपस्थितीत पहिला मेळावा आज पार पडला. यावेळी व्यासपीठावरून बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, देवदत्त निकम, अभिनेते अमोल कोल्हे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नेते नाना काटे, नगरसेवक जालिंदर शिंदे, वसंत लोंढे, मोहिनी लांडे, विक्रांत लांडे आदी यावेळी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group