पुणे (Pclive7.com):- पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर भाजपने या उमेदवार यादीची घोषणा केली. बारामती मतदारसंघातून भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे.
कुल या रासपचे आमदार राहूल कुल यांच्या पत्नी आहेत. बारामतीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध कुल असा सामना होईल.
या निवडणुकीत पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना पक्षाने घरी बसविले आहे. पुण्यात बापट यांनाच उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. तर, बारामतीत सुप्रिया सुळे यांना रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कडवी लढत देतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
























Join Our Whatsapp Group