मावळ (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी अंदर मावळातील परिसरात भेटीगाठी दौरा केला. यावेळी पार्थ पवार यांनी अंदर मावळातील विविध शेतकऱ्यांच्या घरी भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या.

यावेळी पक्षाचे निरीक्षक विजय कोलते, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष अर्चना घारे, पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश खांडगे, किशोर भेगडे, अतिष परदेशी, शोभा कदम, हेमलता काळोखे, सुवर्णा राऊत,काळूराम मालपोटे,सचिन घोटकुले ,संतोष भेगडे ,शिवाजी असवले,सुनिल दाभाडे उपस्थितीत होते. पार्थ पवार यांनी दौरात या भागातील शेतकरी, महिला, तरूण यांच्याशी संवाद साधून अडचणी समजून घेतल्या.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी शुक्रवारी आंदर मावळाच्या पश्चिम भागातील गावांचा दौरा करून मतदारांशी संवाद साधला.

पवार कुटुंबियांनी जनतेशी सातत्याने विकासाची नाळ जोडून ठेवली आहे. पिंपरी चिंचवड चा विकास हा राष्ट्रवादी ने केला आहे. अशाच प्रकारचा विकास हा मावळ मध्ये देखील करून दाखवायचं आहे. अशी ग्वाही मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी दिली.
टाकवे बुद्रुक येथे बाजारपेठेतून पदयात्रा काढून पवार यांनी मतदारांशी संवाद साधला. फळणे येथे विठ्ठल रखमाई मंदिरात गावातील सर्व सुवाक्षिणीने पवार यांचे औक्षण केले. माऊ,मोरमारेवाडी,गभालेवाडी,वडेश्वर,कोंडिवडे,भोयरे,कल्हाट,निगडे, आंबळे,नवलाखउंब्रेत पार्थ पवार यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.
























Join Our Whatsapp Group