पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील काँग्रेसचे माजी नगरसेवक गणेश लोंढे यांच्यावर (गुरूवारी दि.४) रोजी दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी प्राणघातक हल्ला केला. चिंचवडमधील तानाजीनगर येथे ही घटना घडली असून चिंचवड पोलीस ठाण्यात गणेश लोंढे यांनी याबाबत फिर्याद देण्यात आली आहे. गणेश घोलप, आकाश घोलप, सुमित लवे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश लोंढे हे काही कामानिमित्त चिंचवड येथे त्यांच्या मोटारीतून गेले होते. चिंचवड येथील शिवाजी उदय मंडळाजवळ ते आले असता दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडवले. त्यानंतर त्यांनी लोंढे यांनी कारमधून खेचून बाहेर काढत शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गणेश लोंढे हे जखमी झाले असून थेरगाव येथील खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर तिघे आरोपी फरार झाले असून चिंचवड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. योगायोगाने आज दि.५ रोजी गणेश लोंढे यांचा वाढदिवस आहे.
























Join Our Whatsapp Group