पिंपरी चिंचवड शहरातील वकिलांची बैठक
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील क्रांतिवीर चापेकर बंधू यांच्या पोस्टाच्या तिकिटासाठी चापेकर स्मारक समितीच्या वतीने मागील पन्नास वर्षांपासून विविध स्तरावर प्रयत्न सुरु होते, मात्र खासदार बारणे यांनी याबाबत लक्ष घालून केवळ पाच वर्षांत हा प्रश्न मार्गी लावला. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते चापेकर बंधूंच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले, असे मत पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. सतीश गोरडे यांनी व्यक्त केले.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पिंपरी चिंचवड शहरातील वकिलांची बैठक पार पडली. या बैठकीत अॅड. सतीश गोरडे बोलत होते. बैठकीसाठी शहराध्यक्ष योगेश बाबर, गजानन चिंचवडे, मधुकर बाबर, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुनील कडुसकर, माजी अध्यक्ष अॅड. एस बी चांडक, अॅड. अविनाश गोलांडे, अॅड. सुदाम साने, अॅड. रघुनाथ सोनवणे, अॅड. उर्मिला काळभोर, अॅड. मुकुंद ओव्हाळ, अॅड. शिवशंकर शिंदे, अॅड. शशिकांत गावडे आदी उपस्थित होते.

अॅड. सतीश गोरडे म्हणाले, क्रांतिवीर चापेकर बंधू यांच्यावर टपाल तिकीट प्रकाशित करण्यासाठी मागील पन्नास वर्षापासून चापेकर स्मारक समितीच्या वतीने प्रयत्न सुरु होते. विविध स्तरावर सर्व लोकप्रतिनिधींकडे मागणी करण्यात आली. मात्र खासदार बारणे यांनी केवळ पाच वर्षात या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला. मावळ लोकसभा मतदारसंघात जनसामन्यांसोबत काम करत असताना देशाच्या संसदेत देखील उत्तम कामगिरी केली. सर्वाधिक प्रश्न विचारून एक चांगला आदर्श खासदार बारणे यांनी तयार केला आहे. लोणावळा पुणे रेल्वेजाळे विस्तारीकरण, एचए कामगारांचा प्रश्न, तुंगी सारख्या आदिवासी पाड्यावर वीज पोहोचविण्याचे काम त्यांनी केले आहे. पुढील निवडणुकीत देखील खासदार बारणे हेच विजयी होतील, असा विश्वास अॅड. गोरडे यांनी व्यक्त केला.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी विश्वास दाखवून खासदार म्हणून काम करण्याची जबाबदारी दिली. ही जबाबदारी देशाच्या संसदेत आणि मतदारसंघात चांगले काम करून सक्षमपणे पाडली. संसदेत काम करण्यासह मतदारसंघातील नागरिकांशी देखील एकरूप झालो. आजवरच्या संपूर्ण राजकीय जीवनात निस्वार्थभाव जोपासला. येत्या काळात देश सुरक्षित हातात देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करून नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करावे.”
कार्यक्रमाचे संयोजन अॅड. अल्पना रायते, अॅड. दीपाली गाडे, नाना रसाळ, रामहरी कसबे, देविदास शिंदे, तुकाराम पडवळ, अनिल शिंदे यांनी केले. कार्यक्रमात भारत सरकार कडून नोटरी म्हणून नवनिर्वाचित केलेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
























Join Our Whatsapp Group