उरण (Pclive7.com):- उरण तालुक्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जेएनपीटीमध्ये जमिनी गेल्यामुळे स्थानिकांचा रोजगार बुडाला. विद्यमान खासदार त्यावर गप्पच आहेत. जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांमध्ये आक्रोश आहे. मात्र उरण वासीयांनी काळजी करण्याची गरज नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. येत्या काळात प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवून त्यांना मोबदला मिळवून देणारच असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार दिले.
पार्थ पवार हे आज उरण तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पाटील, उरण तालुका काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र घरत, मनसेचे नेते विजय तांडेल, म्हाडाचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव आदी उपस्थित होते.
उरण तालुक्यातील चारफाटा, मुळेखंड फाटा, कारंजा सोसायटी, केगाव, दांडा, बोरी, हनुमान कोळीवाडा, उरण शहर, नवीन शेवे, बोकडविरा, फुंडे, डोंगरी, पाणजे, जसखार, सोनारी, करळ, सावरखार, बेलपाडा, जासई, रांजणपाडा, धुतुम, चिरले गावठाण, जांभूळपाडा, वेशवी, दादरपाडा, कंठवली, विंधणे, नवापाडा, टाकीगाव, धाकटी जुई रस्ता, बोरखार, भोम, चिरनेर, कलांबसुरे, मोठी जुई, कोप्रोली, पिरकोन, सारडे, वशेणी, पुनाडे, गोवठणे, पाले, आवरे, खोपटे, भेंडखळ, नवघर, नवघर पाडा, पागोरे, कुंडेगाव या गावांचा दौरा केला.
उरण तालुक्यातील प्रत्येक गावात पार्थ पवार यांचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी, बँड, ढोल ताशा पथकाने त्यांचे स्वागत केले. या दौऱ्यामध्ये त्यांनी ज्येष्ठ पदाधिकारी, नागरिकांचे आशीर्वाद घेतले. कार्यकर्त्यांची भेट घेत नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी पार्थ पवार म्हणाले, उरण तालुक्यात अनेक प्रश्न आहेत. त्यामध्ये स्थानिकांचा महत्वाचा प्रश्न म्हणजे उरणमधील जेएनपीटीमध्ये स्थानिकांच्या जमिनी गेल्यात त्यामुळे स्थानिकांचा रोजगार बुडाला आहे. मात्र, यावर सदस्यपदी परप्रांतीय असलेल्या स्थानिकाची वर्णी लागली गेली. तसे पाहता याठिकाणी स्थानिक ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांची वर्णी लागणे गरजेचे होते. मात्र अस असताना देखील विद्यमान खासदार गप्पच आहेत. याविषयी जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांमध्ये आक्रोश आहे. मात्र उरण वासीयांनी काळजी करण्याची गरज नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळवून मी देणारच असे आश्वासन यावेळी पार्थ पवार यांनी उरण वासीयांनी दिले.
पार्थ पवार हे नवखे असून सुद्धा जनमानसामध्ये अवघ्या काही दिवसात लोकप्रिय झाले आहेत. पार्थ पवार यांना शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचा राजकीय वारसा लाभला आहे. त्यामुळे भविष्यात त्यांच्या कामाची पद्धत ही चांगलीच असणार आहे. उरण मधील अनेक प्रलंबित कामे पार्थ पवार सोडवतील असा विश्वास आम्हाला आहे. त्यामुळेच उरण तालुक्यातून पार्थ पवार यांना मोठं मताधिक्य मिळवून देऊ असे आश्वासन उरण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी दिले.