पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदार संघात निवडणुकीने चांगलाच जोर धरला आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचाराचा झंझावात सर्वत्र पाहायला मिळत आहे. पुनावळे गाव परिसरात सर्व पक्षीय पाठींबा असलेले अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे प्रचार पत्र घरोघरी पोहोचवण्यात आले आहेत. यावेळी मतदारांकडून मोठा प्रतिसाद त्यांना मिळत आहे.

चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय सुशिक्षित पदवीधर व सर्व पक्षीय पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार राहुल तानाजी कलाटे यांच्या प्रचारार्थ पुनावळे गावात प्रचार पत्रक घरोघरी देण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरीक, महिला वर्ग, तरुण मित्र परिवार यांनी उत्स्फूर्तपणे प्रसिसाद देत राहुल कलाटे यांच्याच पाठीशी राहणार असल्याचे सांगितले. ‘आमचं मत राहुल कलाटे यांनाच’ अशी प्रतिक्रीया नागरिकांकडून येत आहे. पुनावळे गावातून राहुल कलाटे यांना मतदानरूपी आशिर्वाद नक्कीच मिळणार आहे. पुनावळे गावातील मतदार राजा आता स्वतः बोलतोय ‘आता बदल हवा’.. लोकांच्या मनातील आमदार राहुलदादाच हवा.. अशा घोषणा सर्वत्र देण्यात येत होत्या.
यावेळी सागर शिंदे, निलेश ढवळे, केदार दर्शले, अजय नारंगवडे, प्रवीण सावंत, पोपट कलाटे, सूरज मुळीक, वैभव गोरगले, नवनाथ मोहिते, सागर बोरगे, अनिकेत वाघमारे, सौरव शेंडगे, नवनाथ गायकवाड, वैभव दर्शले, संतोष दर्शले, गणेश दर्शले, अशोक दर्शले, सुहास दर्शले, अनिकेत दर्शले, सुधीर कुंभार, नवनाथ फुरडे, सुशील ओव्हाळ, माऊली कुदळे तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group