मावळ (Pclive7.com):- आंदर मावळ मधील सावळा, पिंपरी आणि तळपेवाडीत राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे प्रचारफेरीचे नागरिकांनी शनिवारी जोरदार स्वागत केले. ‘कहो दिलसे, बाळा भाऊ फिरसे’ घोषणांनी हा सर्व परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी गावासाठी केलेल्या कामाचे नागरिकांकडून बाळा भेगडे यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी भेगडे यांनी मावळच्या जनतेची साथ आणि विकासकामे यामुळेच मंत्रीपद मिळाले असून तालुकाच्या विकास करणे हेच आपल्यासमोर लक्ष्य असल्याचे सांगितले. सर्वसामान्य माणूस भाजपशी एकनिष्ठ असून पक्ष वाढविण्यासाठी अनेकांनी हातभार लावला आहे. राज्यात भाजप शिवसेना यांची सत्ता येणार असून मावळचा विकासकरिता यापुढे ही आपण प्रयत्नशील राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
आमच्या बाळा भेगडे यांनी रस्त्यासाठी आणि पाण्यासाठी भरघोस मदत करून आमच्या गावाला प्रगतीच्या दिशेने नेण्याचे काम केले आहे. त्यामुळे आम्हाला यावेळी आमदार नको मंत्रीच हवा ज्यामुळे मावळचा सर्वांगसुंदर विकास होईल.
– शंकर पिंपरकर, पिंपरी गाव
बाळा भेगडे यांनी आमचे गाव दत्तक घेतल्यापासून गावात रस्ते, पाणीसुविधा आणि स्मशानभूमी या बाबतीत खूप प्रगती झालेली आहे. त्यामुळे आमच्या गावातून भरघोस मतदान हे फक्त बाळा भेगडे यांनाच देऊन आमचा मावळातून मंत्री निवडून देणार आहोत.
- शंकर बोऱ्हाडे
माळेगाव खुर्द, ग्रामपंचायत सदस्य
























Join Our Whatsapp Group