पिंपरी (Pclive7.com):- सत्ताधाऱ्यांशी अति जवळीक, भाजपाचे प्रवक्ते असा शिक्का, स्मार्ट सिटीच्या कामातील अंधाधुंद कारभार, ठेकेदारांच्या हिताचे निर्णय तसेच कचरा आणि पाणी टंचाईमुळे अडचणीत आलेल्या आयुक्तांची एक-दोन आठवड्यात बदली होणार असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा कालावधी संपण्यास आणखी सहा ते सात महिन्यांचा अवधी असतानाच हर्डीकर यांना बदलीचे वेध लागले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार स्वत: आयुक्तच बदली करून घेण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते. राज्यातील सत्तांतराची किनार या बदलीला असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर हर्डीकर यांनी महापालिका आयुक्त काम करत असताना भाजपाच्या स्थानिक नेत्यांचीच मर्जी सांभाळण्यावर अधिक भर दिला.विकास कामांच्या निविदा काढताना सत्ताधाऱ्यांना मदत होईल याचीच काळजी घेतल्याने शहरातील कचरा समस्या गाजली होती. यानंतर पाणी टंचाईने उग्र स्वरुप धारण केले. गेल्या गोन ते अडीच वर्षात महापालिकेतील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे विरोधकांनी बाहेर काढली. परंतू या सर्व प्रकरणांना आयुक्तांकडून क्लिनचीट देण्यात आली. म्हणूनच भाजपाचे प्रवक्ते अशी देखील ओळख त्यांची निर्माण झाली आहे. याबरोबरच राज्यातील सत्तेत बदल झाल्यामुळे काही कामांच्या चौकशीचा समेमिरा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळेच हर्डीकर यांनी स्वत:हून बदलीसाठी प्रयत्न चालविल्याचे सांगण्यात येत आहे.
























Join Our Whatsapp Group