पिंपरी (Pclive7.com):- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरीगावात प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. रस्त्यामध्ये प्रभाग क्रमांक २१ मधील अनेक नागरिक बाधित होणार आहेत. या नागरिकांना आवास योजनेत घरे देण्याची मागणी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिकेकडे केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
संदीप वाघेरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरीमधील सर्व्हे नंबर २२६ पै./३ अ व २२७ आरक्षण क्र.१५९ (HDH) येथील महापालिकेच्या ताब्यातील HDH च्या आरक्षित जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे बांधणेचा प्रकल्प नियोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक २१ मधील रस्त्यामुळे बाधित होणा-या लोकांना घरे देण्यात यावीत.रस्ता बाधित लोकांना बांधकाम नियंत्रण व अनधिकृत बांधकाम विभागामार्फत नोटीस देखील देण्यात आली आहे. १९७९ पासून नागरिक त्या जागेवर वास्तव्यास आहेत. योजनेचे नियोजन करताना आरक्षण बाधित लोकांचा महापालिकेच्या झो.नि.पु. विभागामार्फत सर्वे करून योजनेमध्ये घरे देण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group