रुग्णालयातील गैरव्यवहाराप्रकरणी जनहित याचिका दाखल करणार
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात करण्यात आलेली डॉक्टर आणि स्टाफ भरतीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केला असून यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास आपण जनहित याचिका दाखल करणार असल्याचे संदीप वाघेरे यांनी सांगितले आहे.
वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर भरतीत झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात तसेच रुग्णालयात सुरू असलेल्या भोंगळ कारभारासंदर्भात नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नगरसेवक वाघेरे यांनी डॉ. वाबळे यांच्याकडून वायसीएम रुग्णालयात सुरू असलेल्या मनमानी कारभाराचा पाढाच वाचण्यात आला आहे. डॉ. वाबळे यांना कोणतेही अधिकार नसताना ते कशाप्रकारे रुग्णालयातील आर्थिक अधिकारात ढवळाढवळ करतात, याचीही माहिती वाघेरे यांनी निवेदनात दिली आहे.
पी.जी. अभ्यासक्रम ज्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे, त्या उद्देशाला हरताळ फसला जात आहे. डॉक्टरांची उपलब्धता होण्याऐवजी मानधनावरील डॉक्टरांनीच रुग्णालयाचा ताबा घेतला आहे. गोरगरीब रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर वायसीएममधील कारभार सुधारण्याची मागणीही नगरसेवक संदीप वाघेरेंनी यावेळी केली.






















Join Our Whatsapp Group