
पिंपरी (Pclive7.com):- रावेत येथे आज (शनिवार दि.११) सकाळी स्कुल बसला शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. परंतू तोपर्यंत आगीने बसला आपल्या भक्षस्थानी घेतले होते. त्यानंतर अग्निशामन दलाच्या जवानांनी ही आग विझवण्यात यश मिळवले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवीतहाणी झाली नाही.

अग्निशामक दलाच्याने दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील एस.बी.पाटील कॉलेजच्या पार्कींगमध्ये बस क्र. MH-14-CW-3374 ही रात्रीपासून उभी होती. आज शनिवार दि.११ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बस सुरू करताच शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीने काळी वेळाच मोठ्या स्वरूपात पेट घेतला आणि संपूर्ण बस जळून खाक झाली. या दुर्घटनेबाबची माहिती मिळताच प्राधिकरण उपअग्नी केंद्राचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काहीवेळातच अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. फायरमन शंकर पाटील, विष्णू चव्हाण, शिवलाल झनकर, वाहन चालक पद्माकर बोरावके या कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.






















Join Our Whatsapp Group