पिंपरी (Pclive7.com):- ‘कोरोना’चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. प्रशासनासोबत पोलीस देखील रस्त्यावर उतरून विविध उपायोजना करीत आहेत. प्रत्येक परिस्थितीत कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलिसांना ‘कोरोना’चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पिंपरी युवासेनेकडून मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
भोसरी पोलीस ठाण्यात हा उपक्रम राबविण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, आर. डी. तापकीर, तात्या तापकीर, रविंद्र जाधव, मंदा गायकवाड, रेखा थोरात आदी उपस्थित होते.
कोरोनाची खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यासाठी युवासेनेकडून पोलिसांना मास्क आणि सॅनिटायझर देण्यात आले. केंद्र, राज्य, जिल्हा स्तरावर याबाबत खबरदारी आणि उपाययोजना करण्यात येत आहेत.
प्रशासनाकडून वेगवेगळ्या टीम तयार करून जनजागृती केली जात आहे. त्यात सामाजिक बांधिलकी म्हणून युवासेना देखील पुढे आली आहे. कार्यक्रमचे आयोजन युवासेना विभागसंघटक निलेश हाके, आशीर्वाद महिला बचत गटाच्या शीला जाधव, सामाजिक कार्यकर्ते नंदू काची यांनी केले.
























Join Our Whatsapp Group