पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान राबविण्यास सुरुवात केली. त्यांच्या या आवाहनाला शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिसाद देत मोशी मधील शिवसेना नेत्या सौ. रुपालीताई परशुराम आल्हाट व श्री.परशुराम आल्हाट या दाम्पत्याने स्वखर्चाने मोशी मध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानास सुरुवात केली.
जगभरामध्ये ज्या वेगाने कोरोना आजार वाढत आहे त्या वेगानेच महाराष्ट्राला या आजाराने विळखा घातला आहे. त्याला अनुसरून महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान राबविण्यास सुरुवात केली. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत मोशी मधील शिवसेना नेत्या सौ. रुपालीताई परशुराम आल्हाट व श्री. परशुराम आल्हाट या दाम्पत्याने स्वखर्चाने मोशी मध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानास सुरुवात केली.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रथमच हे अभियानाची सुरुवात झाली. त्यांच्या या अभियानाचे पिंपरी चिंचवड शहरामधून कौतुक होत आहे. या दाम्पत्याने पुन्हा एकदा दाखवून दिले की, महाराष्ट्राच्या संकटसमयी शिवसेनाच धावून येते.
यावेळी शिवसेना पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख, व कामगार नेते इरफान सय्यद, शिवसेना पुणे जिल्हा उपप्रमुख निलेश मुटके, शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख व माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, शिवसेना महिला संघटिका भोसरी विधानसभा प्रमुख सौ. रूपाली आल्हाट, समनव्यक भोसरी विधानसभा परशुराम आल्हाट, शिवसेना विभागप्रमुख योगेश बोराटे, युवानेते तुषार आल्हाट, ऍड संकेत चावरे, अमित आल्हाट, विनायक आल्हाट, मनोज आल्हाट, अमोल आल्हाट, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

























Join Our Whatsapp Group