पिंपरी (Pclive7.com):- आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे. त्यादृष्टीने नागरिकांची जनहिताची कामे करावीत, असे आवाहन मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी रविवारी (दि. ३) डांगे चौक येथे केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीने शहरातील नवनिर्वाचित विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष यांचा सत्कार चिखले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहराध्यक्ष हेमंत डांगे, जनहित कक्ष अध्यक्ष राजू भालेराव, पिंपरी विधानसभा विभाग अध्यक्ष सुशिल सोनकांबळे, उपविभाग अध्यक्ष निलेश कांबळे, महेंद्र निशीगंध, शिशिर महाबळेश्वकर, प्रभाग अध्यक्ष युवराज शिंदे, संजय मोरे, चिंचवड विधानसभा उपविभाग अध्यक्ष विवेक नेरलेकर, प्रभाग अध्यक्ष अनिल दहिभाते, संजय पंडित, राजेश येवते आदी उपस्थित होते.
सचिन चिखले म्हणाले, शहरातील नागरिकांना महापालिकेकडून पिण्याचे पाणीही व्यवस्थित मिळत नाही. यासारखे नागरिकांचे दैनंदिन जीवनात असंख्य नागरी प्रश्र आहेत. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अशा प्रश्नांकडे लक्ष देवून पाठपुरावा करुन त्यांची सोडवणूक करावी.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू भालेराव यांनी केले तर, हेमंत डांगे यांनी आभार मानले.






















Join Our Whatsapp Group