पिंपरी (Pclive7.com):- कोरोनामुळे मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून सर्व शाळा बंद ठेवाव्या लागल्या. जवळपास नऊ महिन्यानंतर शहरातील शाळेत पुन्हा किलबिल सुरू झाली. जून पासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले. तरीही शाळा बंदच होत्या मात्र ऑनलाइन वर्ग सुरु झाले. यात पिंपळे सौदागर येथील पी. के. इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे यांनी स्वतः गेटवर मुलांचे स्वागत केले.
कोरोनाच्या प्रादुर्भाव ओसरल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने राज्यातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी ४ जानेवारीपासून शाळा सुरु करण्यासाठी सॅनिटाईजर, मास्क व आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सरकार नियमानुसार सर्व खबरदारी व उपाययोजनाची पुर्तता केलेली आहे. सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोरोना चाचणी (RT-PCR) करण्यात आलेली आहे.
पी.के इंटरनॅशनल स्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत संस्थापक यांच्यासह मुख्याध्यापिका व शिक्षक यांनी शासकीय नियमांचे पालन करून केले. विद्यार्थ्यांची शाळेत येताना त्यांची प्राथमिक स्थळ स्तरावर काही तपासणी करताना प्रत्येक विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या शरीराचे तापमान मशीन द्वारे करण्यात आले. तसेच सर्व वर्ग खोल्या, ऑफिस व परिसराची निर्जंतुकीकरण करण्यात आले . सोशल डिस्टंसिंगचे पालन करून वर्गात २०-२५ विद्यार्थी बसविण्यात आले.
“घरात ७-८ महिन्यापासून बसून असल्यामुळे मुलांची उत्सुकता वाढली होती. सगळे मित्र, शिक्षक खूप दिवसांनी कधी भेटतील असे झाले होते. ऑनलाईन शिक्षण घेताना ज्या काही अडचणी आल्या होत्या ते आता शाळेत आल्यानंतर कमी होतील व चांगले दर्ज्याचे शिक्षण मिळणार आहे. पालकांनी मुलांना शाळेत पाठवताना कोणतीही खंत बाळगू नये. शाळांनाही मुलांची काळजी आहे” असे संस्थापक जगन्नाथ काटे म्हणाले






















Join Our Whatsapp Group