पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक २४ मधील मोठ्या प्रमाणात विकास कामे ठप्प आहेत. त्यासंदर्भात प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते रवि भिलारे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर माई ढोरे यांची प्रत्यक्ष भेटून घेऊन निवेदन दिले. प्रभाग क्र. २४ मधील नागरिकांची होत असलेली गैरसोय व सतत येणाऱ्या अडचणी व प्रभागातील ठप्प विकासकामांचा पाढाच त्यांनी यावेळी वाचला.
याबाबत रवि भिलारे म्हणाले की, केंद्र सरकारने सुरू केलेल्या स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा समावेश करण्यात आला. परंतु प्रभाग क्र.२४ मध्ये गेल्या पाच वर्षात कुठलाही विकास झालेला नाही. त्यामध्ये थेरगाव विभागातील शिवदर्शन कॉलनी, गणेश कॉलनी, आदर्श कॉलनी, स्वप्न पुष्प कॉलनी या भागातील चेंबर्स, रस्ते यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून उघडे असलेले चेंबर्स व त्यामधून बाहेर येणारे सांडपाणी यामुळे प्रभागात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत आहे. तसेच रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अनेक गंभीर मोठे अपघात देखील झाले असल्याचे गार्हाणे रवि भिलारे यांनी महापौरांकडे मांडले.
त्यावर महापौर माई ढोरे म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही लवकरच प्रभाग क्रमांक २४ मध्ये स्वतः येऊन राहिलेल्या विकास कामांची माहिती घेऊ. तसेच सर्व प्रलंबित कामे मार्गी लावू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिले.






















Join Our Whatsapp Group