पुणे (Pclive7.com):- स्वराज्य कौशल्य विकास व व्यवसाय प्रशिक्षण पुणेचे अध्यक्ष विशाल विश्वास डोंगरे यांची महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई यांच्या राज्य समन्वय समितीमध्ये सहा महसूल विभागातून प्रत्येकी एक या पद्धतीने निवड करण्यात आली.
यामध्ये पुणे महसूल विभागातून म्हणजेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या पाच जिल्ह्यामधून केवळ एक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.
या समितीत कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था व शासन यांच्या मध्ये समन्वय साधने, प्रशिक्षण घेताना विविध समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने शासनास शिफारस करणे तसेच शासनाच्या कौशल्य विकास धोरणामध्ये सहभाग, योगदान वाढविण्यासाठी व शासनास उपाय योजना करणे हा हेतू आहे.
विशाल विश्वास डोंगरे हे Msc, MPM असून यापूर्वी त्यांनी विशेष कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष चैतन्य प्रतिष्ठान पुणे म्हणून काम केले असून त्यांना अनेक संस्थांचे व शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त आहेत. तसेच यांनी या पूर्वी राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय उद्योजकता, विकास प्रशिक्षण चा अनुभव असून संस्थेमार्फत अनेक विद्यार्थ्यांना यशस्वी पणे रोजगार व स्वयंरोजगार साठी मार्गदर्शन केले आहे, या प्रसंगी कौशल्य विकास विभागाचे विभागीय उपायुक्त शरद आंगणे यांनी विशाल डोंगरे यांचे अभिनंदन केले.