पिंपरी (Pclive7.com):- चिखली प्रभाग क्र.१ मधील विविध परिसरात कमी दाबाने तसेच दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून नळातून येणारे पाणी गढूळ व अस्वच्छ येत असल्याच्या तक्रारी वाढल्या असून पाणीपुरवठ्याचा दाबही अत्यंत कमी असल्याने नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक यश साने आणि विकास साने यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन तातडीने चिखली परिसरातील पाणीपुरवठा स्वच्छ व सुरळीत करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

या संदर्भात नगरसेवक यश दत्ता (काका) साने यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. सर्व पाईप लाईनची तपासणी करून दूषित पाण्याचा स्रोत शोधावा तसेच आवश्यक ती दुरुस्ती करून सुरळीत व स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना विशेष धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यश साने यांनी केली आहे.



















Join Our Whatsapp Group