पिंपरी (Pclive7.com):- प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे दुचाकी वाहनांसाठी नवीन NC मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकांसाठी दुचाकी वाहनांबाबत आगाऊ अर्ज स्वीकारून लिलाव पद्धती राबविण्यात येणार आहे.

दुचाकी वाहनांच्या नव्या मालिकेची सुरुवात लवकरच करण्यात येणार असून, वाहनधारकांना आकर्षक व पसंतीचे क्रमांक उपलब्ध करून देण्यासाठी ही कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्यास इच्छुक वाहनमालकांनी दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.३० या वेळेत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत.

उर्वरित आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी इच्छुकांनी दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.३० या वेळेत अर्ज करावेत. संबंधित अर्ज नव्या वाहन नोंदणी विभागात सादर करावेत. अर्जासोबत ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, पॅनकार्ड इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
अर्जदारांनी विहित शुल्कासह अर्ज सादर करावा. प्राप्त अर्जांवर नियमानुसार कार्यवाही करून आवश्यक असल्यास लिलाव पद्धतीने क्रमांक निश्चित करण्यात येईल. याबाबत अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे संपर्क साधावा, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड यांनी दिली आहे.



















Join Our Whatsapp Group